Top Update

राज्यातील जि. प. शाळांत 11,798 शिक्षक पदे रिक्त, संपूर्ण जिल्हानिहाय यादी

राज्यातील जि. प. शाळांत 11,798 शिक्षक पदे रिक्त; जिल्हानिहाय रिक्त पदांची संपूर्ण यादी

राज्यातील जिल्हा परिषद (जि. प.) शाळांमध्ये तब्बल 11,798 शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती पवित्र पोर्टलवरील 2025-26 च्या आकडेवारीतून समोर आली आहे. या मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांमुळे विशेषतः ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागातील अनेक मराठी शाळा विद्यार्थीसंख्या घटल्यामुळे बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्याचवेळी हजारो शिक्षक पदे रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्थेतील विसंगती अधिक ठळकपणे समोर येत आहे.

भरती प्रक्रिया सुरू, पण नियुक्त्या रखडल्या

शासनाने सन 2025-26 साठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले असले, तरी अंतिम नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता कायम आहे.

डी.एड., बी.एड. आणि टीईटी उत्तीर्ण हजारो उमेदवारांनी पात्रता परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि इतर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असूनही नियुक्ती आदेश मिळालेला नाही.

महत्त्वाचे :
रिक्त पदे तातडीने भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी उमेदवार आणि शिक्षण क्षेत्रातून सातत्याने केली जात आहे.

शिक्षणतज्ज्ञांचे मत

शिक्षणतज्ज्ञांच्या मते, केवळ विद्यार्थीसंख्या वाढविण्याचा प्रयत्न करून ग्रामीण भागातील मराठी शाळा टिकवणे शक्य नाही. त्यासाठी पुढील बाबींवर प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

  • ✔ प्रशिक्षित शिक्षकांची उपलब्धता
  • ✔ दर्जेदार अध्यापन
  • ✔ मूलभूत शैक्षणिक सुविधा
  • ✔ वेळेत शिक्षक भरती

अन्यथा शिक्षकांवरील वाढता ताण, शिक्षणाच्या गुणवत्तेतील घसरण आणि पालकांचा मराठी माध्यमावरील विश्वास कमी होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

📢 नोकरी विषयक रोजच्या अपडेटसाठी आमचा WhatsApp Group जॉईन करा

👉 WhatsApp Group Join

जिल्हानिहाय रिक्त शिक्षक पदांची यादी

जिल्हा रिक्त पदे
अमरावती580
अहमदनगर200
अकोला50
बीड381
भंडारा424
गडचिरोली450
गोंदिया588
पुणे500
रायगड445
हिंगोली79
रत्नागिरी435
जळगाव350
सांगली479
कोल्हापूर606
सातारा357
बुलढाणा350
चंद्रपूर630
धाराशिव245
नागपूर450
सिंधुदुर्ग252
नंदुरबार370
सोलापूर525
नाशिक720
ठाणे523
पालघर100
वर्धा200
यवतमाळ701
धुळे220
छत्रपती संभाजीनगर0
जालना0
लातूर0
वाशीम0
परभणी0

📢 नोकरी, भरती आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व अपडेट्स मिळवा!

आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

WhatsApp Group Join

Post a Comment

Previous Post Next Post